Shefali Jariwala : काटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन, नेमकं काय झालं?
शेफाली जरीवाला अनेक चित्रपट आणि रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळाली. पण तिला खरी ओळख 'काटा लगा' या म्युझिक व्हिडिओमुळे मिळाली. त्यानंतर ती 'काटा लगा' गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. यासह ही अभिनेत्री बिग बॉस १३, नच बलिये ५ आणि नच बलिये ७ मध्येही दिसली होती.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काटा लगा’ या रिमेक गाण्याने प्रसिद्ध झालेल्या मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. २७ जून रोजी रात्री ११ वाजता शेफालीच्या अचानक छातीत दुखत असल्याचे सांगितले. यानंतर तिचा पती पराग त्यागी याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वी तिला मृत घोषित केले. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेफाली जरीवाला ही मुंबईतील लोखंडवाला शास्त्री नगर येथील गोल्डन रेज इमारतीत राहत होती. तर मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूने चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई पोलिसांनी तिचा पती,अभिनेता पराग त्यागी याचा जबाब नोंदवला आहे. पराग याने खुलासा केला आहे की शेफालीवर आधीच उपचार सुरू होते. तर मुंबई पोलिसांनी शेफाली जरीवालाचे पती पराग त्यागीचा जबाब त्यांच्या घरी नोंदवला आहे. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून आतापर्यंत चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, ज्यात दोन नोकर, एक सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.
