भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण…
महाराष्ट्रभर गाजलेल्या अशोक खऱातच्या भोंदूगिरी प्रकरणात जमीन व्यव्हार समोर आल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये त्याची पत्नी कल्पना खरात हिचादेखील व्यव्हारात हस्तक्षेप असल्याचं समोर आलं होतं.
महाराष्ट्रभर गाजलेल्या अशोक खऱातच्या भोंदूगिरी प्रकरणात जमीन व्यव्हार समोर आल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये त्याची पत्नी कल्पना खरात हिचादेखील व्यव्हारात हस्तक्षेप असल्याचं समोर आलं होतं.
दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदू बाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा दिलासा मिळाला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला असल्याचंही सांगितलं जात आहे. संबंधित जमीन व्यवहार 2004 मधील असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल केला, अशी प्रथिमिक माहिती आहे.
दरम्यान, इतक्या वर्षांत फिर्यादी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी जमीन परत मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात कोणतीही याचिका दाखल केली नसल्याची बाब न्यायालयाने नोंदवली. तसेच व्यवहार करताना फसवणुकीचा अप्रामाणिक हेतू दिसून येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हा व्यवहार अधिकृत नोंदणीकृत कागदपत्रांद्वारे झालेला असून, दिवाणी वादाला गुन्हेगारी स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
