Kalyan : …म्हणून ‘त्या’ मारणाऱ्या व्यक्तीच्या वहिनीवर हात उचलला, रिसेप्शनिस्ट मुलीचा खळबळजनक खुलासा काय?
कल्याणमधील एका मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला आरोपी गोकुळ झा नावाच्या व्यक्तीकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आहे. या घटनेचे आणि जबर मारहाण करतानाचे व्हिडीओ देखील पाहायला मिळाले. या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्याचे दिसतेय.
कल्याण मारहाण प्रकरण आता वेगळ्या वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गोकुळ झा नावाच्या व्यक्तीच्या वाहिनीला रुग्णालयात मारहाण करण्यात आली असा दावा करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी गोकुळ झा याच्या वाहिनीला मारताना दिसत आहे. मात्र हा प्रकार नेमका कधी घडला याची माहिती समोर आलेली नसताना रिसेप्शनिस्ट मुलीने खळबळजनक खुलासा केला आहे. ती तरूणी म्हणाली, त्या व्यक्तीला थांबवण्याची विनंती केली. मात्र त्याने शिवीगाळ केली. यानंतर त्याला मी काही मॅनर्स आहेत की नाही? असं म्हणाली. तर इतकी जबर मारहाण मला केली की माझा जीवही त्यात गेला असता.
पुढे तिने असंही सांगितलं की, मी त्या व्यक्तीच्या वहिनीला मारत असल्याचा व्हिडीओ नंतरचा आहे. आधी त्याने मला मारहाण केली शिवीगाळ केली. मी त्याच्या वहिनीला मारण्याचं कारण एकच आहे की, मला मारत असताना ते त्याला अडवू शकले असते पण त्यांनी कोणीच त्याला अडवलं नाही, असं मारहाण झालेल्या व्यक्तीने म्हटलं.
