Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट

| Updated on: Nov 17, 2025 | 12:21 PM

लाडक्या बहिणी योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत उद्या संपत आहे. एक कोटींहून अधिक महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे मुदतवाढीची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडक्या बहिणी योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत उद्या संपणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या एक कोटींहून अधिक महिलांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे, शासनाकडून ही मुदत वाढवून दिली जाणार का, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती, तरी अनेक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी योजनेसंदर्भात आवश्यक असणाऱ्या ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे समोर आले आहे.

महायुती सरकारची महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्यातील हफ्त्यापूर्वी लाभार्थी महिलांना ई केवायसी करणं अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करताना लाखो महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने कित्येक महिलांनी अद्याप ई-केवायसी केले नाही. १८ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्याने महिलांची चांगलीच धावपळ होताना दिसतेय

Published on: Nov 17, 2025 12:21 PM