Ahilyanagar Leopard Scare :  बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्यानं मांडला उच्छाद; थेट पडला विहिरीत…बघा VIDEO

Ahilyanagar Leopard Scare : बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्यानं मांडला उच्छाद; थेट पडला विहिरीत…बघा VIDEO

| Updated on: Nov 17, 2025 | 5:25 PM

अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ त्रस्त असून, विहिरीत पडलेल्या बिबट्याला ठार मारण्याची मागणी करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला होता तर नऊ वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकर्जुन गावात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ त्रस्त आहेत. सकाळी वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केले होते. त्यानंतर आता आणखी एक बिबट्या विहिरीत पडल्याचे समोर आले आहे. या बिबट्याने यापूर्वी एका मुलीला मारले असून, निंबळक येथे एका मुलावर हल्ला केल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे त्याला ठार मारण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

खारेकर्जुने, ईसळक, निंबळक परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्याने गावकरी आक्रमक झाले आहे. तर पकडलेला बिबट्या आणून दाखवण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. गावात चिमूरड्यांवर हल्ला केलेला हा बिबट्या नसून दुसराच बिबट्या पकडण्यात आल्याचा गावकऱ्यांचा आरोप

Published on: Nov 17, 2025 05:25 PM