Lionel Messi : तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? तुमच्यासाठी मोठी संधी…आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?

Lionel Messi : तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? तुमच्यासाठी मोठी संधी…आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?

Updated on: Dec 04, 2025 | 6:15 PM

प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. प्रोजेक्ट महादेव अंतर्गत निवडलेल्या ६० युवा फुटबॉलपटूंना (३० मुले, ३० मुली) त्याच्या हस्ते पाच वर्षांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. वानखेडे मैदानावर मेस्सी या मुलांना फुटबॉलचे धडे देईल, ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे.

प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. राज्यातील तरुण फुटबॉलपटूंसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. सरकारच्या प्रोजेक्ट महादेव अंतर्गत राज्यातील युवा फुटबॉलपटू तयार करण्यात येत आहेत. या प्रोजेक्टमधून ६० मुले आणि ६० मुलींची निवड करण्यात आली आहे. यापैकी प्रत्येकी ३० मुले आणि ३० मुलींना १४ डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच वर्षांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या निवडक मुलांना वानखेडे मैदानावर लिओनेल मेस्सीसोबत काही क्षण घालवण्याची संधी मिळणार आहे.

मेस्सी या मुलांसोबत एका क्लिनिकमध्ये संवाद साधणार असून, त्यांच्याशी बोलेल आणि कदाचित खेळायलाही मिळेल. प्रोजेक्ट महादेव हा एक-दोन वर्षांचा नसून, पाच वर्षांचा दीर्घकालीन विकास कार्यक्रम आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे निवड चाचण्या घेण्यात आल्या होत्या, ज्यातून या युवा खेळाडूंची अंतिम निवड मुंबईत झाली आहे.

Published on: Dec 04, 2025 06:15 PM