Gotya Gitte Video : गोट्या गित्तेच्या नव्या व्हिडीओनं खळबळ, एकीकडे EVM वर केलं मतदान अन् दुसरीकडे LIVE…
आरोपी गोट्या गित्तेचा नवा कारनामा एका नव्या व्हिडिओमधून समोर आलाय. ईव्हीएम मशीनवर मतदान करताना लाईव्ह व्हिडिओ काढून आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग त्याच्याकडून करण्यात आलाय. गोट्या एकटाच नाही तर त्याच्या अनेक मित्रांचे व्हिडिओ व्हायरल झालेत. गोट्या गित्ते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संशयित आरोपी असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत गोटया गित्ते याने ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केला. एकीकडे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग म्हणून सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होतात. मात्र गोट्या गित्तेसाठी परळीत वेगळा नियम आहे का? तेथील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काढताना त्याला रोखलं का नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाण्यास काही ठिकाणी बंदी, मोबाईल सोबत असेल तरी चित्रण करता येत नाही, असं असताना गोट्या गित्तेने हा व्हिडिओ काढून पोस्ट केला. तसेच परळीत अशाच पद्धतीने गुंडगिरी करून मतदान झाले का? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या व्हिडिओत गोट्या दिसत नाही मात्र त्यानेच हा व्हिडिओ निवडणूक काळात व्हायरल केल्याचं सांगितलं जात आहे.
