MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 8:58 AM

यास्मिन खान हिचं खान अब्दुल अझीजसोबत लग्न झालंय. ओळख लपवण्यासाठी अब्दुल अझीजसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळालीय. अब्दुल अझीज सध्या इटलीमध्ये आहे, दोघांना एक 10 वर्षांचा मुलगा असल्याची माहिती समोर येतेय. तसेच भारतात आल्यास तुरुंगात टाकेन, अशी समीर वानखेडेंकडून अब्दुल अझीजला धमकी दिल्याचाही दावा केला जात आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगाबाहेर आला असला तरी या प्रकरणाचा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत आणखी एक गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेही मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय.

ओळख लपवण्यासाठी समीर वानखेडेंनी भावोजीला तुरूंगात डांबण्याची धमकी दिली. समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीशी झालेल्या निकाह नाम्यातही अब्दुल अझीजचं नाव आहे, पण अब्दुल मूळचा सुरतचा असल्याचं ते म्हणालेत. ट्विट करत त्यांनी या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप केलाय.