महायुतीत आठ विकेट पडणार! सामनातून मोठा दावा; मंत्र्यांची नावंही सांगितली

महायुतीत आठ विकेट पडणार! सामनातून मोठा दावा; मंत्र्यांची नावंही सांगितली

| Updated on: Jul 25, 2025 | 10:38 AM

आठ विकेट पडणार, मंत्रिमंडळात बदल होणार, असा दावा शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आला आहे.

आठ विकेट पडणार, मंत्रिमंडळात बदल होणार, असा दावा शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्कातंत्राच्या तयारीत असल्याचा दावा देखील सामना मधून केलेला आहे. तसंच शिवसेनेच्या तीन ते चार मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता देखील सामनामधून वर्तवली गेली आहे. संजय शिरसाट, भरत गोगवले, दादा भुसे, योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. तर कोकाटे आणि झिरवळ यांना देखील डच्चू मिळण्याची शक्यता असल्याचं सामनामध्ये म्हंटलं आहे. भाजपच्या नितेश राणे आणि जयकुमार गोरे, गिरीश महाजन यांना देखील मंत्रिपद जाण्याचा धोका आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत आहेत. आठ विकेट पडणार, मंत्रिमंडळात बदल होणार. शिवसेनेच्या 3 ते 4 मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता. अनेक नेत्यांवर मंत्रिपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते, असा मोठ दावा सामनामध्ये करण्यात आलेला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Published on: Jul 25, 2025 10:38 AM