Maharashtra Din | 108 हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन

Maharashtra Din | 108 हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन

| Updated on: May 01, 2026 | 9:55 AM

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यभरात उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा लढा केवळ भाषिक राज्यासाठी नव्हता, तर स्वाभिमान, अस्मिता आणि ओळख यासाठीचा होता. या ऐतिहासिक लढ्याची आठवण ठेवत आजचा दिवस राज्यभरात साजरा केला जात आहे.

मुंबईतील हुतात्मा चौक येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत पुष्पचक्र अर्पण केले. राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना त्यांनी मानवंदना दिली. याच वेळी त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमाला महापौर रितू तावडे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.
स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांच्या पुनर्रचनेसाठी देशभरात चळवळ उभी राहिली होती. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठीही मोठा संघर्ष उभा राहिला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या बलिदानातूनच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
आजचा दिवस केवळ उत्सवाचा नसून, त्या ऐतिहासिक लढ्याची आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारा आहे. देशाच्या विकासात आणि प्रगतीत महाराष्ट्र आजही अग्रस्थानी असून, “दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र” अशी ओळख आजही कायम आहे.

Published on: May 01, 2026 09:55 AM
Follow Us