मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी

| Updated on: Jul 21, 2026 | 1:50 PM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भातील आवश्यक तयारी सुरू असून संबंधित यंत्रणा अंतिम प्रक्रियेत व्यस्त असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी दिल्लीतील आंदोलनावरही भाष्य करत विरोधकांवर टीका केली. कोणत्याही आंदोलनात काही चुकीच्या प्रवृत्ती घुसून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील आंदोलनात काही राजकीय पक्ष आणि संघटना स्वतःचे राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा उल्लेख करत पोलिसांनी वेळेवर परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत यांनी आंदोलनकर्त्यांबाबत केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता, “ते नेमके काय बोलले याची मला माहिती नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, सर्व आंदोलनकर्ते एकाच भूमिकेचे नसतात. काही जण प्रामाणिक भावनेने आंदोलन करतात, तर काही जण त्यातून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्जमाफीच्या पहिल्या यादीची घोषणा होणार असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 21, 2026 1:49 PM
Follow Us