Solapur Floods : कृषिमंत्री दत्ता भरणे जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले अन् विचारला जाब, पाहणीदौऱ्यादरम्यान घडलं काय?

Solapur Floods : कृषिमंत्री दत्ता भरणे जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले अन् विचारला जाब, पाहणीदौऱ्यादरम्यान घडलं काय?

| Updated on: Sep 27, 2025 | 4:35 PM

सोलापूर जिल्ह्यातील उद्रेक आणि चाऱ्याच्या गंभीर समस्येवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संतापले. त्यांनी फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचे आदेश दिले.

सोलापूर येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत लोकांपर्यंत मदत न पोहोचल्याबद्दल जाब विचारला. विशेषतः जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या आणि अन्नटंचाईमुळे लोक गाव सोडून पुणे जिल्ह्यात स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. कृषिमंत्री भरणेंनी सोलापूर जिल्ह्यातील उंदरगाव येथे भेट दिली असता, त्यांना लोकांच्या तीव्र भावना आणि प्रशासकीय अनास्थेचा अनुभव आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अद्याप लोकांना का मिळाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

चाऱ्याची अडचण ही सध्याची सर्वात मोठी समस्या असून, ही तात्काळ सोडवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जात असताना, प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्यता ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भरणेंनी केली. प्रांत अधिकारी किंवा तहसीलदारही घटनास्थळी उपस्थित नसल्याने भरणेंनी नाराजी दर्शवली.

Published on: Sep 27, 2025 04:35 PM