Sanjay Raut | आमचा बाप दिल्लीचा, ही विरोधी पक्षाची भूमिका : संजय राऊत

Sanjay Raut | आमचा बाप दिल्लीचा, ही विरोधी पक्षाची भूमिका : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 11:07 AM

आपल्या राज्यातील जनतेला मदत आणि सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची म्हणून काही जबाबदारी आहे.

आपल्या राज्यातील जनतेला मदत आणि सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची म्हणून काही जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतं. विशेषत मुंबई. पण आम्ही तो हिशोब मागायला बसलो नाही. केंद्र आमचा बाप आहे. त्यांच्याकडून मदत झाली तर ती नक्कीच स्विकारली जाईल, असं सांगतानाच केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मंत्री आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचा दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं. आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

Published on: Jul 27, 2021 11:07 AM