केंद्रापाठोपाठ राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

| Updated on: Mar 30, 2022 | 6:48 PM

केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर राज्य सरकारनं देखील तसाच निर्णय घेतला आहे. राज्य सरकार 1 जुलै 2021 पासून कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवणार आहे.

Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कॅबिनेटनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे. आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना महागाई भत्ता 34 टक्के मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर राज्य सरकारनं देखील तसाच निर्णय घेतला आहे. राज्य सरकार 1 जुलै 2021 पासून कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवणार आहे.