Devendra Fadnavis : जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे कोण? मोर्चासाठी कोणाचा पाठिंबा? फडणवीस स्पष्टच बोलले, रोख नेमका कोणाकडे?

Devendra Fadnavis : जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे कोण? मोर्चासाठी कोणाचा पाठिंबा? फडणवीस स्पष्टच बोलले, रोख नेमका कोणाकडे?

| Updated on: Aug 29, 2025 | 8:11 AM

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केले आहे. आंदोलनाला कुणाचं पाठबळ आहे सर्वांनाच माहिती आहे, पण अशा पक्षांना राजकीय फायदा मिळणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे होता?

जरांगेंच्या आंदोलनाला कुणाचा पाठिंबा हे सर्वांना माहिती आहे. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायद्याचा काही पक्षांचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावरून फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर अंतरवाली सराटीहून निघताना जरांगे पाटील फडणवीसांवर टीका करताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांचं कौतुक केलं होतं. त्यावरून बावनकुळेंनी फडणवीस मराठा समाजामध्ये जन्मले नाही हे दुर्दैव आहे का? असा सवाल केला आहे.

जरांगेंच्या आंदोलनाला मराठवाड्यामधील विरोधी आमदार आणि खासदारांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी अजित पवारांचे आमदार राजू नोवघरे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे तर महाविकास आघाडीचे आमदार खासदारांनी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप शिरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजें निंबाळकर…

Published on: Aug 29, 2025 08:11 AM