Police Exam| पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी परीक्षा कधी होणार? जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा

Police Exam| पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी परीक्षा कधी होणार? जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा

| Updated on: May 19, 2026 | 12:35 PM

राज्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील रद्द करण्यात आलेली लेखी परीक्षा आता 24 मे रोजी घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्नांवरून निर्माण झालेल्या वादानंतर प्रशासनाने ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील परीक्षेमध्ये 100 पैकी तब्बल 85 प्रश्न हे विविध प्रश्नसंचांमधून जसेच्या तसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेषतः एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या प्रश्नसंचातील प्रश्न थेट परीक्षेत विचारण्यात आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणानंतर उमेदवार आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

वाद वाढल्यानंतर संबंधित परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, 24 मे रोजी उमेदवारांची पुन्हा लेखी परीक्षा होणार आहे. या निर्णयामुळे परीक्षार्थींमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.

Published on: May 19, 2026 12:35 PM
Follow Us