tv9 Marathi Special Report |  शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

tv9 Marathi Special Report | शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

| Updated on: Apr 05, 2026 | 8:46 AM

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR)च्या आधारे हा खुलासा केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठीच दमानिया यांना हा CDR पुरवण्यात आला आहे.

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर यांनी दमानिया यांनी CDR ची माहिती सार्वजनिक कशी केली, याची चौकशी व्हावी आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली आहे. या सर्व आरोपांवर उत्तर देताना अंजली दमानिया यांनी सांगितलं की, त्यांना हा CDR एका अनोळखी व्यक्तीकडून मिळाला. तसेच, माझ्यावर टीका करण्याऐवजी अशोक खरात यांच्यावर का बोललं जात नाही, असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.

अशोक खरात यांच्यावर महिलांचं शोषण, आर्थिक फसवणूक आणि हवाला व्यवहारांचे गंभीर आरोप आहेत. मात्र, अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवरही खरात यांच्यासोबत विविध राजकीय नेत्यांचे संपर्क असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. यामध्ये रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून भाजपवरच निशाणा साधला जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, शिंदे आणि खरात यांच्यातील फोन कॉल्स नेमके कोणत्या कारणासाठी झाले, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच, CDR लीक कसा झाला आणि त्यामागे कोण आहे, यासह संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Apr 05, 2026 08:46 AM
Follow Us