महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज्यात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या कार्यक्रमाची आखणी केली. देशातील 65% रोजगारक्षम लोकसंख्येला शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देऊन 2047 पर्यंत विकसित, गरिबीमुक्त व बेरोजगारीमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रामध्ये विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली विविध रोजगारक्षम विभागांनी एकत्रित येऊन हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा रोजगार मेळा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 25 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीच्या निमित्ताने सेवा संकल्प अभियान अंतर्गत सुरू करण्यात आला आहे.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची ठरली असून, 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढण्याचा विक्रम झाला आहे. आज भारत तरुणाईने मुसमुसलेला देश आहे, जिथे सरासरी वय 27-28 वर्षे असून, 65% लोकसंख्या रोजगारक्षम आहे. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीवर भर दिला जात आहे. गरिबीमुक्त, बेरोजगारीमुक्त आणि रोगमुक्त भारताच्या निर्मितीसाठी हे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. पंडित दीनदयालजींच्या नावाने हा महारोजगार मेळा महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देईल.
