Mahayuti : राज्यात आपली सत्ता…चाकणकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांतदादा म्हणाले, तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या तरी तिजोरीचा मालक…

Mahayuti : राज्यात आपली सत्ता…चाकणकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांतदादा म्हणाले, तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या तरी तिजोरीचा मालक…

| Updated on: Nov 25, 2025 | 2:42 PM

चंद्रकांत पाटील यांनी “तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे” असे विधान केले आहे, तर संजय शिरसाट यांनी खर्चाचे निर्णय सर्वांच्या सहमतीने होतात असे म्हटले आहे.

राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवरूनही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी “तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे” असे विधान केले. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका, असेही त्यांनी म्हटले. यावर संजय शिरसाट यांनी म्हटले की, तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी खर्च सर्वानुमते ठरतो. चाव्या एकीकडे असल्या तरी निर्णय प्रक्रियेत आम्हीही आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सत्ता असल्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम अर्थमंत्र्यांच्या हातात असते, परंतु मुख्यमंत्री हेच सर्वेसर्वा असतात आणि त्यांना सर्वाधिक अधिकार असतात, हे नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

 

Published on: Nov 25, 2025 02:42 PM