मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल, चक्क 3 लाख 20 हजारांची…

मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल, चक्क 3 लाख 20 हजारांची…

| Updated on: May 11, 2026 | 1:10 PM

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये गोवंश जनावरांच्या अवैध साठवणुकीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये गोवंश जनावरांच्या अवैध साठवणुकीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात मालेगावचे माजी महापौर तसेच एमआयएमचे स्थानिक नेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्या नावाचा समावेश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पवारवाडी आणि किल्ला पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवत शहरातील विविध भागांमध्ये छापे टाकले. सवंदगाव येथील फार्महाऊस आणि संशयीत परिसरातील गोदाम आणि आणखी एका गुप्त ठिकाणी तपास करत पोलिसांनी 18 गोवंश जनावरे जप्त केली. या जनावरांची अंदाजे किंमत 3 लाख 20 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यान ही जनावरे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांची खरेदी-विक्री होणार होती, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: May 11, 2026 01:09 PM
Follow Us