Mallikarjun Kharge on Thackeray Goverment | महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही; मुंबईत रात्री बैठक
एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नसल्याचे म्हटलं आहे. तर यासंदर्भात रात्री बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात भुकंप आला. तर या भुकंपाचे हादरे दिल्लीपर्यंत गेले आहेत. यात हादऱ्यांमुळे भाजपसह काँग्रेसही हादरली आहे. तर हे हादरे भाजपनेच दिल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान आज दिल्लीत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यातील चिघळलेल्या परस्थिती आणि महाविकास आघाडी सरकारवर याचा परिणाम होईल का असं विचारले असता त्यांनी असं काही होणार नाही. एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नसल्याचे म्हटलं आहे. तर यासंदर्भात रात्री बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
Published on: Jun 21, 2022 8:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
