मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर… त्या विधानाची सर्वत्र चर्चा
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आज नवे वळण मिळाले. काल आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले असून या घटनेचा अनेक स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. अशात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन आंदोलनाचे प्रमुख चेहरा अभिजीत दीपके यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना धीर देत शांततेच्या आंदोलनाची ताकद अधोरेखित केली.
“शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे आम्ही दाखवून दिलय. आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपल्या मायबापाने, जिल्ह्याने आणि तालुक्याने यांना मतदान केलय,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी, “या पुढच्या काळात तुम्हाला धक्का जरी लागला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळा देश आणि राज्य तुमच्या पाठिशी आहे. जंतर-मंतर सोडू नका. वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार,” अशी घोषणाही केली.
तसेच, “मतदान भाजपला करायचं. पण पक्ष मोठा मानायचा की लेकराला हे भाजपला मतदान करणाऱ्यांनी ओळखलं पाहिजे. आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी आहे. ते जेव्हा सांगतील, बोलवतील त्यावेळी आम्ही येऊ. त्यांनी हाक मारली तर मी येणार,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.