तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट… मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख…

तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट… मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख…

| Updated on: Aug 17, 2026 | 11:50 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट आव्हान दिले आहे. ते सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरी त्यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा करत ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी लावून धरली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट आव्हान दिले आहे. ते सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरी त्यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा करत ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी लावून धरली आहे. जर सरकारने या ५८ लाख नोंदींमधून एकही नोंद कमी करण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज सरकार पाडेल, असा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. गेल्या वर्षभरापासून आपण या नोंदींचा डेटा मागत असल्याचे, परंतु सरकार जाणीवपूर्वक नोंदी कमी करून मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये मान्य झालेल्या काही मागण्यांवर अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांचा समावेश आहे, ज्यासाठी ते २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करतील. काही राजकीय नेत्यांवर आणि अभ्यासकांवर गंभीर आरोप करताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट आणि घुमरे यांनी मराठा समाजाचा तळतळाट घेतला आहे. त्यामुळे सराकर कधी पडेल कळणारही नाही. गोरगरिबांचे वाटोळे करण्याचे काम ते करत असून, याचिका दाखल करण्यासाठी आणि इतर नाट्यमय गोष्टी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या कृतींचे पुरावे आता समोर येऊ लागले आहेत, असेही पाटील यांनी सूचित केले.

Published on: Aug 17, 2026 11:50 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us