मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

| Updated on: Aug 19, 2026 | 9:35 PM

सुरुवातीचे 10 ते 20 दिवस अंतरवाली सराटीतच उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार असल्याचा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे असं जरांगे म्हणालेत. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे. 10-20 दिवस अंतरवालीत […]

सुरुवातीचे 10 ते 20 दिवस अंतरवाली सराटीतच उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार असल्याचा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे असं जरांगे म्हणालेत. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे. 10-20 दिवस अंतरवालीत आमरण उपोषण करायचंय. 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं. मराठा समाजाच्या जीवन मरणाशी धोका निर्माण झालाय देवेंद्र फडणवीसांमुळे, एकनाथ शिंदेंमुळे. यांनी न रद्द होणारे प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली, मी गप कसा काय बसणार? ते जे अधिकारी आहेत सगळे, बावनकुळे, यांना हाताखाली धरलंय आणि मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही हे षडयंत्र रचलंय. मराठे यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत.

Published on: Aug 19, 2026 9:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us