MCA President : अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी, बिनविरोध निवड अन्…
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रसाद लाड, विहंग सरनाईक यांच्यासह अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या मध्यस्थीने ही बिनविरोध निवड शक्य झाली.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असताना, प्रसाद लाड आणि विहंग सरनाईक यांनी आपले अर्ज मागे घेतले. यापूर्वी डायना एडलजी यांनीही अर्ज मागे घेतला होता. या माघारींमुळे अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
या निवडणुकीत राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने सुरुवातीला चुरस निर्माण झाली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी झालेल्या घडामोडींमुळे नाईक यांची निवड निर्विवादपणे झाली. १२ नोव्हेंबर रोजी एमसीएच्या अन्य पदांसाठी निवडणूक होणार आहे.
Published on: Nov 10, 2025 05:55 PM
