tv9 Marathi Special Report | व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत

tv9 Marathi Special Report | व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत

| Updated on: Mar 11, 2026 | 12:10 PM

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. सध्या सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य दिले जात असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जवळपास बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय, लहान उद्योग आणि विविध व्यावसायिक आस्थापनांना मोठा फटका बसत आहे.

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. सध्या सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य दिले जात असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जवळपास बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय, लहान उद्योग आणि विविध व्यावसायिक आस्थापनांना मोठा फटका बसत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्ससमोर बंद पडण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत तसेच नागपूरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. युद्धामुळे आखाती देशांतून होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य दिले जात असल्याने व्यावसायिक गॅसच्या गाड्या अनेक ठिकाणी प्लांटच्या बाहेरच थांबून असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईचा फटका मंदिरांमधील अन्नछत्रांनाही बसत आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला 11 दिवस उलटले असून त्याचा परिणाम उद्योगांवर आणि रोजगारावरही होऊ लागला आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्याने काही उद्योगांमध्ये कामकाज मंदावले असून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 11, 2026 12:10 PM
Follow Us