Kabutar khana:  जैन मुनीची कोर्ट अन् BMC ला धमकी तरीही मंत्री लोढा सौम्य? एका वाक्यात भाष्य अन् बोलणं टाळलं

Kabutar khana: जैन मुनीची कोर्ट अन् BMC ला धमकी तरीही मंत्री लोढा सौम्य? एका वाक्यात भाष्य अन् बोलणं टाळलं

| Updated on: Aug 12, 2025 | 1:39 PM

कबुतरांच्या वादामध्ये एका जैन मुनींनं दिलेल्या इशाऱ्यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अतिशय सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्था आणि कोर्टाला आव्हान दिलं जात असताना त्याबद्दल मंत्री लोढा सौम्य का? असा प्रश्न यावरून विचारला जातोय.

कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना सुप्रीम कोर्ट झटका दिला. त्यामुळे कबुतरांना दाणे टाकताना कोणी आढळलं त्यावर कोणत्याही परिस्थितीत आता गुन्हा दाखल होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला तर दुसरीकडे कोर्टाला आव्हान आणि हाती शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनीवर भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानाशी सहमत नाही इतकच बोलून मौन बाळगलंय.

आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे कबुतर खाने बंद करण्याचे आदेश कोर्टाने महापालिकेला दिले होते त्यानंतर महापालिकेने दादरसहित अनेक भागातील कबुतर खान्यांवर ताडपत्री टाकून ते बंद केले यावर आमच्या धर्माविरोधात गेला तर आम्ही कोर्टाला मानणार नाही आणि वेळ पडली तर हातात शस्त्रही घेऊ अशी चिथावणी जैन मुनींनी दिली होती त्यामुळे जैन मुनी कोर्ट आणि पालिकेला धमकावताय का या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 12, 2025 01:39 PM