मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
मीरा-भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्लॅब कोसळण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी एक स्कूल बस घटनास्थळावरून पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी एमएमआरडीएकडून कंत्राटदारांवर एकूण 12 कोटी 5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कंत्राटदार जे. कुमार यांना 10 कोटी, फिनिशिंग कंत्राटदाराला […]
मीरा-भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्लॅब कोसळण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी एक स्कूल बस घटनास्थळावरून पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी एमएमआरडीएकडून कंत्राटदारांवर एकूण 12 कोटी 5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कंत्राटदार जे. कुमार यांना 10 कोटी, फिनिशिंग कंत्राटदाराला 1 कोटी 5 लाख, तर सिस्ट्रा-सीईजीवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर एक्स पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची आणि अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच मुंबई आणि एमएमआरमधील सुरू असलेल्या सर्व मेट्रो कामांचे थर्ड पार्टी सुरक्षा ऑडिट तातडीने करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
