मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा पुन्हा पुणे दौरा, शहराध्यक्ष Vasant More यांची माहिती

| Updated on: Jul 21, 2021 | 2:59 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray Pune) हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा शेवटचा दिवस असला तरी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला आहे.

Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray Pune) हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा शेवटचा दिवस असला तरी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला आहे. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

सध्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे 30 जुलैपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे. राज ठाकरे यांनी यादरम्यान पुण्यातील विकास कामाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांना घरी येण्याचे निमंत्रणही दिले आहे. त्याचबरोबर मनसे शहरात राजदूतांची नेमणूकही करणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.