‘औद्योगिक श्वेतपत्रिका की चिखलफेक पत्रिका?’, मनसेचा राज्य सरकारला खोचक सवाल, नेमकं काय केलं ट्वीट?

| Updated on: Aug 06, 2023 | 8:35 AM

VIDEO | 'राज्यात उद्योग टिकावेत म्हणून सरकारने काय प्रयत्न केले?', औद्योगिक श्वेतपत्रिकेवरुन मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Follow us on

मुंबई, 6 ऑगस्ट 2023 | गेल्या दोन दिवसांपूर्वी उद्योग विभागाकडून श्वेतपत्रिका विधिमंडळात सादर केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये महाराष्ट्राबाहेर गेलेल्या काही मोठ्या प्रकल्पांसंदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. उदय सामंत यांच्याकडून ही श्वेतपत्रिका विधिमंडळात सादर करण्यात आली. तर वेदांता फॅाक्सकॅान, एअरबस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्यबाहेर का गेले याची श्वेतपत्रिकेत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यावर मनसेने निशाणा साधत औद्योगिक श्वेतपत्रिका आहे की चिखलफेक पत्रिका? असा खोचक सवाल करत राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. ‘गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातून परराज्यात अनेक महत्वाचे उद्योग गेले. औद्योगीकरणाची गंगोत्री म्हणजे महाराष्ट्र, पण राजकीय अनास्थेमुळे महाराष्ट्राकडे पाठ करून उद्योग इतर राज्यात का चाललेत ह्याचं चिंतन खरं तर राज्य सरकारने आणलेल्या श्वेतपत्रिकेत असणं अपेक्षित होतं. पण झालं भलतंच. असं काही घडलंच नाही आणि जर काही चुकीचं घडलंच असेल तर आमचा काय दोष असं मागच्या आणि विद्यमान सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनीच श्वेतपत्रिकेतून घोषित केलं. महाराष्ट्राला ह्यात स्वारस्य नाही. महाराष्ट्राला या ५ प्रश्नांची उत्तरं हवी आहेत’, असे मनसेनं ट्विट करत सरकारकडे उत्तरं मागितले आहेत.