पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदी थेट इटलीच्या PMला दिले मेलॉडी चॉकलेट गिफ्ट, Video Viral
इटली दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जगभरात चर्चेत आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जीया मॅलोनी यांनी मोदींचं खास स्वागत करत त्यांच्यासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो आणि त्यांचा व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला.

या दौऱ्यात भारत आणि इटली यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि जागतिक सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना “मेलॉडी” नावाचं खास चॉकलेट गिफ्ट दिल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर “मेलॉडी” या शब्दावरून अनेक मजेशीर प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत.
इटलीमध्ये मोदींच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. भारतीय समुदायानेही मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यामुळे हा दौरा राजकीय तसेच सोशल मीडियावरही विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.