Monsoon Update | मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं आगमन कधी?

Monsoon Update | मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं आगमन कधी?

| Updated on: May 15, 2026 | 3:56 PM

मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर आली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सून आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या 6 जून रोजी कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.

दरम्यान, अंदमान-निकोबार बेटांमध्ये 16 मेच्या आसपास मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 मे ते 19 मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मान्सून वेळेत दाखल झाल्यास शेती कामांना वेग येण्याची शक्यता असून, उष्णतेने त्रस्त नागरिकांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: May 15, 2026 03:56 PM
Follow Us