Atal Setu Pothole : अटल सेतूच्याखाली खचला रस्ता, पडलं भलंमोठं भगदाड, फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठा निर्णय

Atal Setu Pothole : अटल सेतूच्याखाली खचला रस्ता, पडलं भलंमोठं भगदाड, फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठा निर्णय

| Updated on: Sep 17, 2025 | 4:04 PM

मुंबईतील अटल सेतूच्या खाली असलेला रस्ता गेल्या आठवड्यापासून खचलेला आहे. विस फूटांपेक्षा जास्त खोल खड्डा पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बीपीटी, एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे.

मुंबईतील अटल सेतूच्या खाली असलेल्या मुंबई पोर्ट रस्त्याचा एक भाग गेल्या आठवड्यात खचला आहे. सुमारे वीस फूटांपेक्षा जास्त खोल खड्डा पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पाचशे मीटरचा हा रस्ता मानखुरच्या दिशेने जातो. स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर बीपीटी, एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पाहणी करून गेले. आठवडा उलटून गेला तरी अजूनही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला असला तरी, खचलेल्या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. पावसाळ्यात अशा घटना मुंबईत वाढल्या आहेत, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या आश्वासनांना अनुसरून या रस्त्याची दुरुस्ती केली जाणे आवश्यक आहे.

Published on: Sep 17, 2025 04:04 PM