Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
मुंबईतील मलबार हिल परिसरातील गुजराती भाषेतील फलकांवर अखेर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मनसेच्या तक्रारीनंतर महापालिकेने संबंधित फलक हटवल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील मलबार हिल परिसरातील गुजराती भाषेतील फलकांवर अखेर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मनसेच्या तक्रारीनंतर महापालिकेने संबंधित फलक हटवल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलबार हिल परिसरात काही ठिकाणी लावण्यात आलेले गुजराती भाषेतील नामफलक हटवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. यासंदर्भात मनसेने महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत मुंबई महापालिकेच्या ‘ए’ विभागाने संबंधित परिसरात पाहणी करून कारवाई केली. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणारे गुजराती फलक हटवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मनसेने यापूर्वीही सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी केली होती.
या कारवाईनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.
