आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार, मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू

| Updated on: May 17, 2026 | 10:13 AM

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज रेल्वेच्या देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला असून, प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ठाणे ते कल्याण दरम्यानच्या जलद मार्गिकेवर हा मेगाब्लॉक आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपासून सुरू झाला असून, दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत तो लागू राहणार आहे. या कालावधीत रेल्वे प्रशासनाकडून देखभाल, अभियांत्रिकी आणि सिग्नल यंत्रणेची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.

मेगाब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, जलद मार्गावरील काम पूर्ण झाल्यानंतरच फास्ट लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, हार्बर मार्गावरही आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल दरम्यानच्या मार्गावर देखभाल कामे केली जाणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवांवरही परिणाम होणार असून, प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Published on: May 17, 2026 10:13 AM
Follow Us