Mumbai Mega Block | मुंबईकरांनो… आज लोकल ट्रेननं प्रवास करताय? जाणून घ्या कसा आहे मेगाब्लॉक?

Mumbai Mega Block | मुंबईकरांनो… आज लोकल ट्रेननं प्रवास करताय? जाणून घ्या कसा आहे मेगाब्लॉक?

Harshada Shinkar | Updated on: Aug 06, 2023 | 12:19 PM

VIDEO | आज रविवारी घराबाहेर पडताय? मुंबई लोकलचं वेळापत्रक जाणून घेऊनच मुंबई लोकलने प्रवास करा...कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | मुंबईकरांनो… आज तुम्ही लोकलने घराबाहेर जाण्याचा विचार असेल तर ही बातमी आणि व्हिडीओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर तांत्रिक काम करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात आज काहीसा बदल असणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते ठाणे दरम्यान उप आणि डाउन धिम्या मार्गवर सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यत असणार आहे तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यत ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गांवर ही उद्या ब्लॉक असणार आहे कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published on: Aug 06, 2023 12:19 PM
Follow Us