मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये…
मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे मुसळधार पावसामुळे धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मॅनहोलचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची माहिती समोर आली आहे. हा मॅनहोल तब्बल 20 ते 25 फुट खोल असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे खड्डे, उघडी गटारे आणि मॅनहोल नागरिकांना दिसत नसल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत. साकीनाका येथील घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
यावेळी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांनी सतर्क राहावे आणि पाणी साचलेल्या रस्त्यांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र या घटनेने नागरकांमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे.