Mumbai | मुंबईच्या वर्सोवा गावात नारळी पौर्णिमेची मोठी धामधूम

Mumbai | मुंबईच्या वर्सोवा गावात नारळी पौर्णिमेची मोठी धामधूम

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 7:14 AM

सोन्याच्या नारळ घेऊन वेसावे गावातील 9 गाव एकत्र येत पारंपरिक यात्रेने दर्याला नारळ अर्पण करतात. हिंगला देवी मंदिरापासून ते वर्सोवा किनाऱ्यापर्यंत ही शोभायात्रा निघते. सर्व कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी होतात.

वर्सोवा येथे दर्याला नारळ अर्पण करुन आज नारळी पौर्णिमा साजरी केली. मुंबईच्या वेसावे म्हणजे वर्सोवा गावात नारळी पौर्णिमेची मोठी धामधूम पाहायला असते. या ठिकाणी 150 वर्षांपासून नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधव साजरा करतात. आजपासून सुरू झालेला हा उत्सव पुढे गोकुळाष्टमीपर्यंत सुरू रहातो. आज सोन्याच्या नारळ घेऊन वेसावे गावातील 9 गाव एकत्र येत पारंपरिक यात्रेने दर्याला नारळ अर्पण करतात. हिंगला देवी मंदिरापासून ते वर्सोवा किनाऱ्यापर्यंत ही शोभायात्रा निघते. सर्व कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी होतात.
नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नारळ विसर्जनाकरिता वरळी कोळीवाड्यात उपस्थित होते. शिवसेना शाखा क्रमांक 159 इथे पोचल्यानंतर ते सायकल चालवित समुद्र किनाऱ्यापर्यंत गेले. वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्यापर्यंत आदित्य ठाकरे सायकलने आले. तेथे त्यांनी विधिवत पूजा अर्चना करून समुद्रात नारळ सोडला.