एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर

एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर

| Updated on: Jul 02, 2026 | 3:31 PM

मुंबईतील साकीनाका परिसरात मुसळधार पावसादरम्यान अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खैरानी रोड परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असताना एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पाण्यातून रस्ता ओलांडत असताना त्याला मॅनहोलचा अंदाज आला नाही. पाण्याखाली झाकलेला मॅनहोल अचानक समोर आल्याने तो थेट आत कोसळला. हा मॅनहोल सुमारे 20 ते 25 फुट खोल असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, काही वेळानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.

Published on: Jul 02, 2026 3:31 PM
Follow Us