Mumbai Train Tragedy : रेल्वे मोटारमन आंदोलनामुळे प्रवाशांना मनःस्ताप, लोकल खोळंबल्यानं ट्रॅकवरून चालणाऱ्या तिघांना ट्रेननं उडवलं अन्..
सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. मुंब्रा दुर्घटनेतील अभियंत्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला होता. यामुळे प्रवासी रुळावरून चालत असताना सँडहर्स्ट रोडजवळ अंबरनाथ लोकलनं चार जणांना उडवलं, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईत सीएसएमटी स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा एक तास ठप्प झाली होती. मुंब्रा दुर्घटनेतील दोन अभियंत्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नॅशनल मजदूर रेल्वे युनियनने हा संप पुकारला होता. या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. लोकल सेवा खोळंबल्याने अनेक प्रवासी रेल्वे रुळावरून चालत निघाले होते. याच दरम्यान सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ एका अंबरनाथ लोकलनं रुळावरून चालणाऱ्या चार प्रवाशांना उडवले. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आंदोलन संपल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत होत असतानाच हा अपघात घडला.
Published on: Nov 06, 2025 11:08 PM
