Thane | ठाण्यात फेरीवाल्याची मनपा पथकांना धमकी, दोन दिवस होऊनही गुन्हा दाखल नाही

Thane | ठाण्यात फेरीवाल्याची मनपा पथकांना धमकी, दोन दिवस होऊनही गुन्हा दाखल नाही

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 4:24 PM

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची बोटं छाटण्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा फेरीवाल्याने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या पातलीपाडा भागात असणाऱ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाई करताना हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

आधी बोट कापलं, आता गळा कापू, असा शब्दात फेरीवाल्याने अतिक्रमण हटवणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. मात्र याबाबत कासारवडवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. फेरीवाला हा नारळ विक्रेता आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या पातलीपाडा भागात असणाऱ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाई करताना हा प्रकार घडला.

यापूर्वी कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्याची बोटे कापली होती. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने धास्ती घेतली असून भीती निर्माण झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.