‘मविआ’ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?

‘मविआ’ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?

| Updated on: Jul 02, 2026 | 11:18 AM

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे किरण सरनाईक यांच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात खासदार आणि आमदारांच्या फुटीमुळे विरोधकांना मोठे धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटाच्या माध्यमातून उपसभापतीपदाचा अर्ज भरला होता. काल त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा रंगली.

दरम्यान, किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिका स्पष्ट करत राज्याच्या विकासासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी पक्षाची ताकद वाढली असून आगामी काळात आणखी राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 02, 2026 11:16 AM
Follow Us