Rising Viral Infections : हवामान बदलामुळे सर्दी, खोकला अन् तापाचे रुग्ण वाढले, डॉक्टरांचं आवाहन काय?

Rising Viral Infections : हवामान बदलामुळे सर्दी, खोकला अन् तापाचे रुग्ण वाढले, डॉक्टरांचं आवाहन काय?

| Updated on: Sep 18, 2025 | 12:31 PM

नाागपूर आणि परिसरात सध्या सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. डॉ. अविनाश गावंडे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, व्हायरल आजारांची संख्या वाढल्याचे सांगितले आहे. मुलांना इतर आजारी मुलांपासून दूर ठेवणे, स्वच्छता राखणे आणि योग्य आहार, झोप आणि व्यायाम यावर भर देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

नाागपूर शहरात आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि ताप या आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. स्थानिक रुग्णालयांमध्ये ओपीडी रुग्णसंख्या चौपट झाली आहे. नाागपूर मेडिकलचे अधीक्षक आणि प्रमुख पीडियाट्रीशियन डॉ. अविनाश गावंडे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे व्हायरल आजारांचा प्रसार वाढला आहे. डेंगूसारखे आजार या वर्षी कमी असले तरी, फिव्हर, सर्दी आणि खोकला यांचा प्रादुर्भाव मोठा आहे. काही टायफाइड आणि हँड-फूट-माऊथ रोगाचे रुग्णही आढळून आले आहेत. डॉ. गावंडे यांनी मुलांना इतर आजारी मुलांपासून दूर ठेवणे, चांगली स्वच्छता, योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नाागपूर मेडिकलमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Sep 18, 2025 12:26 PM