Nalasopara : शेजाऱ्यावर जीव जडला, तिनं नवऱ्याला थेट घरातच पुरलं, नालासोपाऱ्यात हादरवून टाकणारा मर्डर!

Nalasopara : शेजाऱ्यावर जीव जडला, तिनं नवऱ्याला थेट घरातच पुरलं, नालासोपाऱ्यात हादरवून टाकणारा मर्डर!

| Updated on: Jul 21, 2025 | 5:11 PM

गेल्या 15 दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली असून, दोन दिवसांपूर्वी महिलेच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मॅसेज आढळल्यानंतर चौकशी केली असता त्यातून या हत्येचा उलगडा झाला आहे.

बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला राहत्या घरातच पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे उघड झाली आहे. इतकंच नाहीतर राहत्या घरात पत्नीने पतीला पुरल्यानंतर त्यावर पतीच्या भावाकडूनच टाईल्सही लावून घेतल्याची माहिती समोर येत आहे.

नालासोपारा पूर्व गडगापाडा येथील साई वेल्फेअर सोसायटीच्या एका चाळीच्या रूममध्ये ही घटना घडली आहे. गुडीया चमन चौहान आणि मोनू विश्वकर्मा असे आरोपी बॉयफ्रेंड आणि प्रियेसीचे नाव आहे. तर विजय चौहान असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. यांना एक चेतन चौहान हा 8 वर्षांचा मुलगा आहे. तर बॉयफ्रेंड आणि प्रियेशी यांचे आजूबाजूलाच घर आहे. पती हा या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून, राहत्या घरात निर्घृणपणे हत्या करून त्याला घरातच पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.

Solapur : मंगळवेढ्यात मृत्यूचा थरार, प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव; दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्…

Published on: Jul 21, 2025 05:01 PM