NalaSopara | मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून नागरिकांनी दिला चोप

NalaSopara | मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून नागरिकांनी दिला चोप

| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 12:58 PM

नालासोपा-यात  मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून नागरिकांनी चांगलाच  चोप दिला आहे.  नालासोपारा पूर्व स्टेशन मार्केट परिसरातील रात्री 8 च्या सुमारास ची ही घटना आहे.

नालासोपा-यात  मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून नागरिकांनी चांगलाच  चोप दिला आहे.  नालासोपारा पूर्व स्टेशन मार्केट परिसरातील रात्री 8 च्या सुमारास ची ही घटना आहे. एक महिला भाजी खरेदी  करत असताना या चोराने तिच्या बेगेतून मोबाईल काढण्याचा प्रयत्न  करत असताना एका सुजाण नागरिकाचा या घटने वर लक्ष जाताच त्याने चोरट्याला  रंगे हाथ पकडून चोप दिला आहे .  चोरट्या ला बेदम चोप देऊन, पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हाकेच्या अंतरावर तुळींज पोलीस ठाणे असतानाही, चोरीच्याआ घटना घडत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त केल्या जात आहे. नालासोपारा मध्ये वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.