जे काही सरकारमध्ये सुरुये, त्याला दुरुस्त करण्याची वेळ आलीये : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे,त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असून 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय, असे मोठे व्यक्तव्य केलंय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे,त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असून 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय, असे मोठे व्यक्तव्य केलंय. नाना पटोले यांनी भंडाऱ्यात काँग्रेस द्वारे आयोजित कार्यक्रमात केले आहे. नाना पटोलेंच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय जाणकारांचा भुवया उंचावल्या असून 10 मार्च नंतर नांना पटोले मोठ्या राजकीय भूकंप आणनार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. 5 राज्याच्या निवडणुका असून माझे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं आहे, असं नाना पटोले म्हणाले.
