MahaFast News 100 |  उद्धव ठाकरे यांनी कायमचं घरी बसावं, नारायण राणेंचा हल्लाबोल

MahaFast News 100 | उद्धव ठाकरे यांनी कायमचं घरी बसावं, नारायण राणेंचा हल्लाबोल

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 23, 2021 | 1:00 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचं काम सुरुचं ठेवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरच राहावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं कोकणाच्या दौऱ्यावर आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचं काम सुरुचं ठेवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरच राहावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण माझं घर आहे घरी आल्यावर आनंद होतोच, असं म्हटलंय. आज कोकणात येताना प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे देखील सोबत आहेत. मी पहिला कोकणचा दौरा केला. त्याचा अहवाल घेऊन केंद्रात गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी दिले, असंही नारायण राणे म्हणाले.

Follow Us