Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना… ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल

Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना… ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल

| Updated on: Jul 10, 2026 | 1:48 PM

नाशिक महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाने तातडीची पत्रकार परिषद घेत या सर्व दाव्यांचे खंडन केले. या पत्रकार परिषदेत गटनेते केशव पोरजे यांनी पक्षातील कोणताही नगरसेवक फुटणार नसल्याचा ठाम दावा केला.

केशव पोरजे म्हणाले की, “काल आम्ही महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी आमचे 13 नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक फुटत असल्याच्या चर्चा पूर्णपणे अफवा असून, आमच्यात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.”

पुढे बोलताना त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “शिंदे गटाकडून एजंटमार्फत आमच्या काही नगरसेवकांशी संपर्क साधला जात आहे. विकासकामांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या निधीचे आमिष दाखवले जात आहे. आतापर्यंत पाच ते सहा नगरसेवकांशी संपर्क साधल्याची माहिती आमच्याकडे आहे.”

पोरजे यांनी आरोप केला की, “ठाकरे गटाच्या नगरसेवकांना महापालिकेकडून निधी मिळू नये, अधिकारी लक्ष देऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरसेवक वैतागून पक्ष सोडतील, अशी रणनीती आखली जात आहे. मात्र आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही.”

यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्ष सोडायचा असेल तर आधी राजीनामा द्यावा. अन्यथा पक्षांतर करणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई होईल. जनता अशा नगरसेवकांना कधीही माफ करणार नाही.”

दरम्यान, “साम, दाम, दंड, भेद” या मार्गाने ठाकरे गट फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, “आमच्या प्रत्येक नगरसेवकाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम आहे. आम्हाला फुटीची कोणतीही भीती नाही,” असा विश्वासही केशव पोरजे यांनी व्यक्त केला.

Published on: Jul 10, 2026 1:48 PM
Follow Us