मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी… मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान

मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी… मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान

| Updated on: Jun 26, 2026 | 12:58 PM

राज्यात गाजलेल्या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले. पोलिसांनी अत्यंत चांगल्या प्रकारे चौकशी केली असून सरकारी वकिलांनीही न्यायालयात भक्कम मुद्दे मांडल्याचे त्यांनी सांगितले. दो

राज्यात गाजलेल्या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पुण्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर नराधमान अत्याचार केला होता, अन् तिची निघृण हत्या केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले. पोलिसांनी अत्यंत चांगल्या प्रकारे चौकशी केली असून सरकारी वकिलांनीही न्यायालयात भक्कम मुद्दे मांडल्याचे त्यांनी सांगितले. दोषीला शिक्षा देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला असून 29 तारखेला अधिकृत घोषणा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, हीच माझी मागणी असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

तसेच न्यायालयाने सुट्टीच्या काळातही या प्रकरणाची सुनावणी घेतल्यामुळे ही केस भविष्यात बेंचमार्क म्हणून ओळखली जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, केतन अग्रवाल यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याचे सांगत समाज म्हणून आपण गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. चांगल्या घरातील मुला-मुलींमध्ये सूड भावना का निर्माण होत आहे, याचा सामाजिक स्तरावर विचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Published on: Jun 26, 2026 12:58 PM
Follow Us