साकीनाका प्रकरणानंतर महिला आयोग पथक मुंबईत दाखल

साकीनाका प्रकरणानंतर महिला आयोग पथक मुंबईत दाखल

| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 12:29 PM

साकिनाका बलात्कार प्रकरणी महिला आयोग सदस्या चंद्रमुखी देवी यांनी आज साकिनाका घटनास्थळ आणि साकिनाका पोलीस स्टेशनला भेट दिली.महाराष्टात गेल्या दोन वर्षापासून महिला आयोगाची स्थापना नाही, असं त्या म्हणाल्या.

साकिनाका बलात्कार प्रकरणी महिला आयोग सदस्या चंद्रमुखी देवी यांनी आज साकिनाका घटनास्थळ आणि साकिनाका पोलीस स्टेशनला भेट दिली.महाराष्टात गेल्या दोन वर्षापासून महिला आयोगाची स्थापना नाही, असं त्या म्हणाल्या. कोणत्याही महिलांच्या चारित्र्यावर बोलण्यात येऊ नये. राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून महिला आयोगाची स्थापना का होत नाही, हा प्रश्न असल्याच चंद्रमुखी देवी म्हणाल्या आहेत. पोलीस सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत, मात्र त्यांचा धाक असला पाहिजे, असं चंद्रमुखी देवी म्हणाल्या.  पीडित महिलेच्या परिवाराची भेट घेतली असून त्यांना योग्य ती मदत देण्याचं सांगू तसेच हा रिपोर्ट उद्याच महिला आयोगाकडे सोपावणार आहे.